पुणे, १३ ऑगस्ट २०२५ : जिल्ह्यातील साहसी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या माजी सैनिकांची माहिती सैनिक कल्याण विभागाने 21 ऑगस्ट 2025 पर्यंत मागितली आहे. ज्या माजी सैनिकांचे साहसी प्रशिक्षण (बेसिक माउंटेनिंग कोर्स, एडवांस्ड माउंटेनिंग कोर्स, पैरा ग्लाइडिंग, पैरा जंपिंग, रिवर राफ्टिंग, एक्सपर्ट इन स्विमिंग) झालेले आहे त्या माजी सैनिकांनी खालीलप्रमाणे आपली माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे 21ऑगस्ट 2025 पर्यंत जमा करावी.
माजी सैनिकांनी आर्मी नंबर, रैंक, नाव, पत्ता, जन्म तारीख, कोर्सचे नाव, कोर्स केलेल्या संस्थेचे नाव, मोबाईल नंबर इत्यादी माहिती द्यावी असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
More Stories
पुणे: सैनिक कल्याण विभाग येथे कारगिल विजय दिवसाचे आयोजन
खडकीत ४ ऑगस्टपासून अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन; विविध श्रेणींसाठी संधी
पुणे: राष्ट्रनिर्माणासाठी अनोखा पुढाकार – तीन हजार विद्यार्थ्यांना भारतीय सेनेत सामील होण्यासाठी मिळाले प्रोत्साहन