लोणी काळभोर, दि. 19 एप्रिल 2021: करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी 100 नागरिकांनी मृत व्यक्तीचे पाय धुऊन पाणी प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला.
रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या सत्तर वर्षीय बसप्पा (नाव बदलले आहे) यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर नातेवाईकांच्या विनंतीवरून रुग्णालय प्रशासनाने मृतदेह बसप्पाच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
नातेवाईकांनी शेवटची अंघोळ घालण्याच्या नावाखाली मृतदेह दाटीवाटीच्या बस्तीत नेला. त्या ठिकाणी दहाहून अधिक महिलांनी मृतदेहाला अंघोळ घातली. तसेच शंभराहून अधिक नातेवाइकांनी मृतदेहाचे पाय धुतलेले पाणी पिण्यास सुरुवात केली.
ही बाब एका स्थानिक कार्यकर्त्याला खटकल्याने त्याने विरोध केला. मात्र, नातेवाइकांनी त्याला गप्प राहण्यास सांगितले. संबंधित कार्यकर्त्याने वरील प्रकार व्हॉट्सऑप ग्रुपवर टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
More Stories