‘रिलायबल पेस्ट कंट्रोल’ कडून सुरक्षारक्षकांचे मोफत लसीकरण

पुणे, १७/७/२०२१: – ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’ मार्फत चालू असलेल्या लसीकरण आपल्या दारी या मोहिमेच्या आजच्या टप्प्यात ‘रिलायबल पेस्ट कंट्रोल’ या पेस्ट कंट्रोल सेवेमधील नामांकीत कंपनीकडून सुरक्षारक्षकांचे मोफत लसीकरण करण्यात आले.

याबाबत बोलताना कंपनीचे अध्यक्ष निखिल खणसे म्हणाले, ” गेल्या दीड वर्षापासून रिलायबलचे कर्मचारी आघाडीवर राहून कोरोनाशी दोन हात करण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर रिलायबलने प्रथमतः त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे लसीकरण कंपनीने पूर्ण करून घेतले होते. रिलायबलने यावर्षी आपल्या सेवेच्या ४० व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त आम्ही वर्षभर सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून अनेक उपक्रम राबवणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून रिलायबलकडून सुरक्षा रक्षकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. समाजात यासारखे अनेक घटक आहेत जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने त्यांना लस घेणे शक्य होत नव्हते तसेच लस उपलब्ध होत नव्हती. त्यांच्या लसीकरणाची जबाबदारी सामाजिक जाणिवेतून रिलायबलने उचलली व लसीकरण करून घेतले. इतर कंपनीज आणि संस्थांनीही पुढे येऊन आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांच्या लसीकरणाची सीएसआर अंतर्गत जबाबदारी उचलून लसीकरणाला वेग देण्यात सहकार्य करावे.”