पुणे, १२ आॅगस्ट २०२५: पुणे महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती देण्यासाठी पीएमसी रोड मित्र ॲप तयार केले आहे. या मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो थेट महापालिका प्रशासनला पाठवता येणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून संबंधित ठिकाणची अक्षांश आणि रेखाक्षं फोटोवर येणार असल्याने संबंधित खड्ड्यांची जागेची निश्चित माहिती प्रशासलाना कळणार आहे. त्यामुळे खड्डे बुजविल्याचा फोटो तक्रारदाराला पाहता येणार आहे. या ॲपचे लवकर आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचुन खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे दुचाकी चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी दुचाकी बंद पडत आहे.शहरातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. काही जखमींना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले, काही कायमचे जायबंदी झाले आहेत .त्यातच . शहरात डेनेज आणि जलवाहिनी टाकण्यासाठी मोठया प्रमाणात रस्ते खोदाई केली होती. या रस्ते खोदाई आणि पँचवकेचे काम करण्यात आले होते. पण हे पँचवके रसत्याशी एकरुप झाले नाही. रस्ते खोदाई नंतरच्या वरवरच्या मलमपटटीमुळे रस्ते उघडत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्डाच्या तक्रारीसाठी पालिकेने पीएमसी रोड मित्र ॲप तयार केले आहे. या मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो थेट महापालिका प्रशासनला पाठवता येणार आहेत. खड्ड्यांच्या ठिकाणी दुरुस्ती करुन त्याठिकाणचे फोटो संबंधित अधिकाऱ्यांला अॅपमध्ये टाकावे लागणार आहे असे पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
पीएमसी रोड मित्र अॅपवर नागरिक खड्ड्याच्या ठिकाणचे दोन ते तीन फोटो, तसेच व्हिडिओ अॅपमध्ये अपलोड करु शकतात . ॲपच्या माध्यमातून आलेल्या फोटोंवर जागेची लोकेशन दर्शविली जाणार आहे। त्यामुळे यामाध्यमातून आलेली तक्कार संबंधित अधिकार क्षेत्रातील पथ विभागाच्या कनिष्ठ अभियत्यांला ऑटोमेटिक जाणार आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित कनिष्ठ अभियंत्याला संबंधित ठिकाणी खड्डा बुजवून त्याचे फोटो त्या तक्रारीच्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत. ते अपलोड केल्यानंतर संबंधित तक्रारदाराला पूर्वीची स्थिती आणि काम केल्यानंतरची स्थिती दोन्ही दिसणार आहे. त्यानंतरच ही तक्रार बंद होणार आहे.
अॅन्ड्राईड मोबाईल मध्ये ॲप उपलब्ध
पथ विभागाने तयार केलेले ॲप युजर फ्रेंडली आहे. सध्या हे ॲप अन्ड्राईड वर्जन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. नागरिक आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करु शकतात. पीएमसी रोड मित्र ॲप वर तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित तक्रारीचे काय झाले, याचे डॅशबोर्ड पथ विभाग प्रमुखांना दिसणार आहे. त्यामुळे एखाद्या भागातील तक्रारीचे काय झाले, कोणत्या अधिकाऱ्यांनी तक्रारीचे निवारण केले, अथवा केले नाही. याची अत्यंभूत माहिती विभाग प्रमुखांना कळणार आहे, असे अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
More Stories
समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी
पुणेकरांनी गणेशोत्सवात जपले पर्यावरण, साडेसहा लाख गणेशमूर्तीचे विसर्जन
Pune: सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा मेकओव्हर – १४५ कोटींची तरतूद मंजूर