पुणे: उंड्रीत इंडस रूग्णालयातील रोकड लुटली; कंपाउडरला केली मारहाण

पुणे,२६ जुलै २०२१ :- पायाला जखम झाल्याचा बहाणा करून रूग्णालयातील कंपाउडरला उपचार करण्याची मागणी करीत काउंटरवरील गल्ल्यातील ८ हजारांची रोकड आणि औषधे असा मिळून १३ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २२ जुलैला रात्री बाराच्या सुमारास उंड्रीतील इंडस हॉस्पिटलमध्ये घडली. त्याशिवाय आरोपींनी कंपाउंडरला मारहाण करून जखमी केले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूण उंड्रीतील इंडस हॉस्पिटलमध्ये कंपाउडर आहे. २२ जुलैला रात्री बाराच्या सुमारास दोन दुचाकीवरील चार तरूण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आले. त्यातील एकाने पायाला जखम झाल्याचे सांगत कंपाउडरला उपचार करण्यास सांगितले. त्यानंतर इतरांनी हॉस्पिटलच्या गल्ल्यातील ८ हजारांची रोकड आणि औषधे असा १३ हजारांचा ऐवज चोरून नेला.

त्यानंतर आरोपींनी कंपाउंडर तरूणाला खुर्चीने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आर. एस. मोहिते तपास करीत आहेत.