स्वीटमार्टमधून दीड लाखांच्या रोकडची चोरी

पुणे, २६/७/२०२१  – स्वीटमार्टमध्ये ठेवलेली दीड लाखांची रोकड आणि सीसीटीव्हीचा डिव्हीआर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २४ ते २५ जुलैदरम्यान कोंढवा खुर्दमधील बधाई स्वीटमार्टमध्ये घडली. याप्रकरणी चेलाराम चौधरी (वय ४८, रा. कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंके विहार रस्त्यावरील इमारतीत चेलाराम यांचे बधाई स्वीटमार्ट आहे. २४ जुलैला त्यांनी दुकानातील ड्रॉव्हरमध्ये दीड लाखांची रोकड ठेवली होती. त्यानंतर ते घरी गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून दीड लाखांची रोकड आणि सीसीटीव्ही डिव्हीआर असा १ लाख ५२ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. के. चाउस तपास करीत आहेत.