पीएमपीएमएलच्या पुण्यदशम बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

पुणे, १४ जुलै २०२१: पुणे महानगरपालिकेकडून पुणे महानगर परिवहन महामंडळाला “दहा रुपयात दिवसभर एसी बस प्रवास” या योजनेसाठी ५० मिडी सीएनजी एसी बसेसचे लोकार्पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते दि.९ जुलै २०२१ रोजी आर्यन पार्किंग, महात्मा फुले मंडई येथे करण्यात आले.

“दहा रुपयात दिवसभर एसी बस प्रवास” या योजनेला “अटल सेवा…शटल सेवा पुण्यदशम” असे नाव देण्यात आले असून दि.९ जुलै २०२१ पासून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ९ मार्गांवर सुरु झालेल्या या योजनेला प्रवाशी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याची माहिती खालीलप्रमाणे

दिनांक मार्गावरील बसेस उत्पन्न एकूण उत्पन्न प्रवासी संख्या एकूण प्रवासी संख्या
सकाळ दुपार सकाळ दुपार
०९/०७/२०२१ १४ १६९९० १६९९० १६९९ ३३९८
१०/०७/२०२१ ३१ ४१ ३३६६० २८१६० ६१८२० ६१८२ १२३६४
११/०७/२०२१ ३० ३५ २६३५० १९३३० ४५६८० ४५६८ ९१३६
१२/०७/२०२१ ४६ ४३ ६०९८५ २८७८५ ८९७७० ८९७७ १७९५४
१३/०७/२०२१ ४६ ३६ ६२३७० २७२६० ८९६३० ८९६३ १७९२६
एकूण १५३ १६९ १८५३६५ १२०५२५ ३०३८९० ३०३८९ ६०७७८
  • दि. ९ जुलै ते दि. १३ जुलै २०२१ पर्यंत एकूण ६०७७८ प्रवाशांनी “पुण्यदशम” बससेवेचा लाभ घेतला असून महामंडळास एकूण ३,०३,८९०/- रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
  • “अटल सेवा…शटल सेवा पुण्यदशम” या योजनेअंतर्गत मिडी सीएनजी एसी बसेस खालील ९ मार्गांवर धावत असून बसेसची संख्या व वारंवारिता खालील तक्त्यात नमूद केली आहे.
अ.क्र. मार्ग

क्रमांक

पासून पर्यंत बस

संख्या

वारंवारिता
पुणे स्टेशन ते शिवाजीनगर नवीन एसटी स्टॅण्ड

मार्गे – कलेक्टर कचेरी, मनपा, लोकमंगल, वाकडेवाडी

०३ ३० मि.
स्वारगेट ते शिवाजीनगर

मार्गे – शनिपार, अ.ब.चौक, मनपा, येताना मंडई

२० ०३ मि.
स्वारगेट ते पुणे स्टेशन

मार्गे – एस पी कॉलेज, केसरीवाडा, अ.ब.चौक, फडके हौद

०२ ४० मि.
स्वारगेट ते शिवाजीनगर

मार्गे – एस पी कॉलेज, डेक्कन, फर्ग्युसन रोड येताना जंगली महाराज रोड

०४ १५ मि.
स्वारगेट ते पुणे स्टेशन

मार्गे – नाना पेठ, पॉवर हाऊस, के ई एम हॉस्पीटल

१० ०५ मि.
स्वारगेट ते पुणे स्टेशन

मार्गे – नाना पेठ, सोन्या मारूती चौक, कमला नेहरू हॉस्पीटल येताना कस्तुरी चौक, मोमीन पूरा

०२ ४० मि.
म. गांधी स्टॅण्ड ते डेक्कन

मार्गे – काशिवाडी, नाना पेठ, सोन्या मारूती चौक, लक्ष्मी रोड, डेक्कन

०३ ३० मि.
पुणे स्टेशन ते डेक्कन

मार्गे – कलेक्टर कचेरी, अपोलो टॉकीज, वसंत टॉकीज, केसरीवाडा, डेक्कन

०३ २० मि.
पुणे स्टेशन ते डेक्कन

मार्गे – वेस्टएण्ड, नाना पेठ, सिटी पोस्ट, लक्ष्मी रोड

०३ ३० मि.
एकुण ५०