पुणे, 26/11/2022: कोथरुड, दत्तवाडी भागात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून साडेचार लाखांचे मेफेड्रोन, गांजा जप्त करण्यात आला.
दत्तवाडी भागात एक जण गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक करण्यात आली. नरेंद्र रामदास बोराडे (वय ३३, रा. अचानक चौक, उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून दहा हजार ३८० रुपयांच ५१९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
कोथरुड भागातील भेलकेनगर परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी पकडले. रोहन रत्नाकर दळवी (वय ३०, रा. सुंदर गार्डन, भेलकेनगर, कोथरुड), कुणाल रमेश पाटील (वय ३२, रा भूमी स्लिव्हरिओ, देहू-आळंदी रस्ता, मोशी ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यकाडून चार लाख ५९ हजार रुपयांचा २९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, सुजीत वाडेकर, मनोज साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.
More Stories
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000 डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत जर्मनीच्या तात्जाना मारिया हिला विजेतेपद
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश