पुणे, ०९/०९/२०२३: शहरात चंदन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरट्यांनी कर्वेनगर भागातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत आशिष पवार यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत सुरक्षा अधिकारी आहेत. मध्यरात्री चाेरटे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारात शिरले. चोरट्यांनी करवतीचा वापर करुन चंदनाचे झाड कापून नेले. चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करत आहेत.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून चंदन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. खासगी संस्था, तसेच शासकीय संस्थांच्या कार्यालयात शिरुन चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली आहेत. गेल्या आठवड्यात चंदन चोरट्यांनी खडकीतील किर्लोस्कर कंपनीच्या आवरातून चंदनाचे झाड कापून नेले होते. त्यावेळी सुरक्षारक्षक आणि चंदन चोरट्यांमध्ये झटापट झाली होती.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?