पुणे: सराईत वाहन चोरट्याला अटक, १० दुचाकी जप्त

पुणे दि. २१/११/२०२२: शहरातील विविध भागांतून दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने अटक केली. त्याच्याकडून १० दुचाकी जप्त करण्यात आल्या असून १३ गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत.

दिपक गोरख डाडर, वय२५ , रा. मुळगाव माहिजवळ ता. कर्जत जि. नगर व सध्या रा. भिवरी ता. पुरंदर जि. पुणे
असे अटक केलेल्याचे नाव आहे

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे एपीआय नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक शाहिद शेख, बाळु गायकवाड, रविंद्र लोखंडे, चंद्रकांत जाधव, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते. त्यावेळी रविंद्र लोखंडे व पोलीस अंमलदार शिवाजी सातपुते यांना वाहनचोराची माहिती मिळाली. तो नरपतगिरी चौकाकडुन मालधक्का चौकाकडे जाणाया रोडवरती थांबला होता.पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दिपक गोरख डाडर, वय२५ , रा. मुळगाव माहिजवळ ता. कर्जत जि. नगर व सध्या रा. भिवरी ता. पुरंदर जि. पुणे असे नाव सांगितले. चौकशीत त्याने पुणे शहरातून १० व इतर ०३ असे १३ वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक एस. वाय. शेख करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजनान टोम्पे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, एपीआय निरीक्षक नरेंद्र पाटील, उप निरीक्षक शाहीद शेख, बाळु गायकवाड, रविंद्र लोखंडे, चंद्रकांत जाधव, गणेश ढगे, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी केली आहे.