पुणे, दि. ०९/०८/२०२२: गोदामाची भिंत पाडून चोरट्यांनी वेगवेगळ्या वंâपनीची तब्बल १२ लाख ६५ हजारांचे वाईन बॉक्स चोरून नेले आहेत. ही घटना ६ ते ८ ऑगस्टदरम्यान पुणे-सासवड रस्त्यावरील श्रीनाथ वेअर हाउसमध्ये घडली.
संतोष केशवे (वय ३३, रा. शेवाळवाडी ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पुणे- सासवड रस्त्यावर वाइन इन्टरप्रायझेज प्रा. लि. श्रीनाथ वेअर हाउसिंग गोदाम आहे. संतोष हे संबंधित गोदामाचे मॅनेजर आहेत. चोरट्यांनी ६ ते ८ ऑगस्टदरम्यान गोदामाची भिंत पाडून वेगवेगळ्या वंâपनीचे वाईन बॉक्स, डिव्हीआर असा मिळून १२ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करीत आहेत.
More Stories
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत तात्जाना मारिया व निगिना अब्दुरैमोवा यांच्यात अंतिम लढत