पुणे: सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ऑक्सी पार्क योजनेच्या शुल्क आकारणीला स्थगिती :- उदय सामंत

पुणे, १२ जून २०२१: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘एसपीपीयू ऑक्सी पार्क’ या योजनेंतर्गत विद्यापीठात सकाळी व संध्याकाळी फिरणाऱ्या सामान्य नागरिकांनाही शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय स्थगित करून योजनेची पुनर्रचना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या असल्याचे तसेच लवकरच स्थगितीचे परिपत्रक निघेल, असे उदय सामंत यांनी ट्विट करून सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशासाठी हजार रुपये शुक्ल आकारण्यात येणार असल्याचे परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढले. हे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी युक्रांदच्या वतीने करण्यात येत आहे. विद्यापीठ परिसरसारखा ठेवासंदर्भात नवनवीन नियम तयार करून विद्यापीठ नेमके काय साध्य करू पाहत आहे, हे समजत नाही. विद्यापीठाने ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे ते सोडून सर्व काही करत आहे, त्यामुळे काहीतरी चुकीचे सुरू आहे हे जाणवत आहे. विद्यापीठ प्रशासनाने सदर परिपत्रक तात्काळ मागे न घेतल्यास विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या आणी संघटना यांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा युवक क्रांती दलाचे पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी सांगितले आहे.