पुणे: ४४ विद्यार्थ्यांसह शाळेची बस दरीत कोसळल्याची घटना; सर्वांची सुखरूप सुटका

पुणे, दि.२७/०९/२०२२: आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगाव तर्फे घोडा येथील शाळेची बस मौजे गिरवली येथे दरीमध्ये पडल्याची घटना घडली आहे. आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेलेले असता बस दरीमध्ये गेली असून त्यामध्ये ४४ विद्यार्थी व ३ शिक्षक होते.
सर्वांना बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलेले असून ४ मुले मंचर येथे उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे. बचाव कार्य करण्यात आलेले असून ॲम्बुलन्सद्वारे सर्वांना ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे दाखल करण्यात आलेले असून वैद्यकीय सुविधा देण्याचे कामकाज सध्या सुरू आहे.