पुणे: हडपसर परिसरात कंपनीत सुरक्षारक्षक खून

पुणे दि.१५/११/२०२२: हडपसर परिसरात कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या नाकाताेंडाला कापडाने करचकुचन आवळुन जीवे ठार मारलेला एक मृतदेह सापडला आहे. काशनिाथ कृष्णा महाजन (५५), रा.जळगाव असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पाेलीस ठाण्यात अज्ञात आराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शंकर मुरलीधर बनकर (४२), रा.पुणे यांनी पाेलीसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
तक्रारदार शंकर बनकर यांची हडपसर परिसरात फुरसुंगी येथे माेनार्च कंपनीचे गाेदम आहे. त्यांचे कंपनीतील सुरक्षारक्षक व डिझेल मॅकेनिक काशिनाथ महाजन हे गाेडावुन खाेलीत असताना, काेणीतरी अज्ञात आराेपीने अज्ञात कारणासाठी शुक्रवार (११ नाेव्हेंबर) राेजी संध्याकाळी ७.०० ते सोमवार (१४ नाेव्हेंबर) राेजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या दरम्यान काशिनाथ महाजन यांचा श्वास गुदमरला जाईल या हेतूने त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या नाकाताेंडाला कापडाने आवळुन बांधुन त्यांना जीवे ठार मारले आहे.
या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांसह हडपसर पाेलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयताचा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.