October 7, 2025

पुणे: महिला आयोगाकडून खडसेंच्या जावई बाबत धक्कादायक खुलासे; मोबाईल मधे नग्न व्हिडीओ तसेच मानवी तस्करीच आरोप

पुणे, ७ ऑगस्ट २०२५: काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना ड्रग्स पार्टी करताना अटक केली होती.या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या वतीने पुणे पोलिसांना पत्रव्यवहार करत काही सूचना करण्यात आल्या होत्या.ज्यात कुमारी सानवी बहुउद्देशीय संस्था असेल तसेच शांताबाई बहुद्देशीय संस्था यांच्यामार्फत महिला आयोगाला पत्र पाठविण्यात आलं होत आणि या पत्रांच्या माध्यमातून राज्य महिला आयोगाच्या वतीने पुणे पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आलं होत आणि याबाबत पोलिसांनी अहवाल सादर केलं असून ज्यात धक्कादायक खुलासे समोर आले आहे.

याबाबतची माहिती आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की पुणे पोलिसांनी या प्रकरणात जे अहवाल दिलं आहे ते अहवाल अतिशय भयावह आहे. प्रांजल खेवलकर यांच्या घरातून जो मोबाईल जप्त करण्यात आलं होतं त्यात सायबर तज्ञांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईलच्या हिडन फोल्डर मध्ये महिलांसोबत असलेले चॅट चे स्क्रीन शॉट,पार्टीचे फोटो,व्हिडीओ,तसेच महिलांचे नग्न तसेच अर्धनग्न फोटो तसेच काही अशोभनीय कृतीचे व्हिडिओ समोर आले आहे.तसेच या मोबाईल मधे जे व्हॉट्सॲप चॅट करण्यात आले आहे त्यात एकूण सात मुली आढळून आल्या आहे आणि या सात ही मुलींची नावं ही आरुष या नावाने सेव्ह करण्यात आले होते आणि अरुष नावाचं व्यक्ती हा मुलीच ह्युमन ट्रॅफेकिंग करत होता.तसेच या आरुष नावाच्या व्यक्तीने या महिलांना पार्टीसाठी पुणे आणि लोणावळा येथे बोलावले होते असे धक्कादायक खुलासे अहवालात देण्यात आलं असल्याचं यावेळी चाकणकर म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की प्रांजल खेवलकर यांच्या चॅट चे अवलोकन केल असता त्यात महिलांसोबत अपात्जनक चॅटिंग तसेच मुलींना फिल्ममध्ये शूटिंगबाबत संपर्क साधलेला आहे.या मुलीनं पिक्चर मधे काम देतो म्हणून बोलावून त्याचं वापर करून त्यांच्या खर्चाचे देखील पैसे न दिल्याचे दिसून आले आहे.प्रांजल खेवलकर याने पुणे, गोवा, लोणावळा, साकीनाका आणि जळगाव येथे मुलींना बोलावून पार्ट्या केल्या आहे तसेच मुलींसोबत लैंगिक अत्याचार देखील केल असल्याचा समोर आला आहे.