पुणे: सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार अड्डयावर छापा, २८ जणांविरूद्ध कारवाई

पुणे, दि. ५/०८/२०२२ – सामाजिक सुरक्षा विभागाने जुगार अड्डयावर छापा टावूâन २८ जणांविरूद्ध कारवाई केली. त्याठिकाणाहून  १२ मोबाइल, दुचाकी, जुगारीचे साहित्य असा मिळून दीड लाखांवर ऐवज जप्त करण्यात आला. चतुःशृंगी परिसरातील दसरा चौकात ही कारवाई करण्यात आली.

वसंत शिंदे, रविंद गजधाने, दीपक म्हात्रे, रवींद्र तलवार अशी जुगार घेणाNयांची नावे आहेत. सखाराम पाडळे, बबन वडमारे, विश्वास गायकवाड, धनंजय सरोदे, ध्रुपद खंखरे, महेंद्र ओव्हाळ, सोमनाथ सपकाळ यांच्यासह इतरांविरूद्ध  चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार अड्डयावरून पोलिसांनी मोबाइल, दुचाकी, साहित्य असा ऐवज जप्त केला.