पुणे, १९ मे २०२५: सायबेज आशा ट्रस्ट, पुणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत येरवडा मध्यवर्ती कारागृहात सीएसआर निधीतून बंद्यांच्या नातेवाईक व वकिलांसाठी अत्याधुनिक आणि सर्व सुविधा असलेले मुलाखत प्रतीक्षालय उभारले आहे. या प्रतीक्षालयाचे उद्घाटन दिनांक १९ मे २०२५ रोजी स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे, अरुण नथानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि., तसेच रितू नथानी, संचालिका, सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि., पुणे यांच्या शुभहस्ते आणि विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
उद्घाटन करण्यात आलेल्या प्रतीक्षालयात नातेवाईक व वकिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, मुलाखत नोंदणी कक्ष, मदत व सहाय्य कक्ष, हिरकणी कक्ष, उपहारगृह, वॉटर कुलर, तसेच महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, टीव्ही संचाद्वारे भेटीची माहिती अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या आधुनिक प्रतीक्षालयामुळे बंद्यांचे नातेवाईक आणि वकील यांना निश्चितच दिलासा व सुविधा मिळणार आहे.
सदर कार्यक्रमात स्वाती साठे यांनी सायबेज प्रा. लि. यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले. या उपक्रमासाठी डॉ. सुहास वारके (भा.पो.से.), अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह), महाराष्ट्र राज्य पुणे आणि स्वाती साठे यांचे मार्गदर्शन लाभले.
उद्घाटन समारंभास सुनील एन. डमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, नितीन वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, पुणे, पी. पी. कदम, अति. अधीक्षक, डॉ. भाईदास ढोले, उपाधीक्षक, आर. ई. गायकवाड, उपाधीक्षक, आनंदा एस. कांदे, वरिष्ठ अधिकारी/कर्मचारी हे उपस्थित होते.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार