लोणावळा, १३/०९/२०२२: लोणावळ्यात भटक्या श्वानांना दांडक्याने मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी नितीन विद्याप्पा अहिरे, राजेश गणेश आचार्य, संजय वासू आचार्य, मोहन यादव (सर्व रा. स्वारंग सोसायटी, गोल्ड व्हॅली, तुंगार्ली, लोणावळा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रियंका व्हिस्पी बालापोरिया (वय ३१, रा. स्वारंग साेसायटी, गोल्ड व्हॅली, तुंगार्ली, लोणावळा, मूळ रा. हाजीअली, मुंबई) यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्राण्यांना क्रुरतेने वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुंगार्लीतील गोल्ड व्हॅली परिसरात चार भटक्या श्वानांना अहिरे, आचार्य, यादव यांनी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्या पैकी एका श्वानाचा मृत्यू झाला, असे बालापोरिया यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लक्ष्मण उंडे तपास करत आहेत.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा