पुणे: विद्यार्थ्यांना परीक्षेपासून ठेवले वंचित, क्लाईन मेमोरियल शाळेच्या विरोधात राष्ट्रवादीने घातला गोंधळ

पुणे, १ नोव्हेंबर २०२२: बिबवेवाडीतील क्लाईन मेमोरियल या शाळेमध्ये पालकांनी फी भरली नाही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे . याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शाळेत गोंधळ घातून प्रशासनाला जाब विचारला.
फीस भरली नाही असे कारण सांगून ज्यांनी फी भरली अशांच्या पाल्यांना ही शाळेच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना बसून दिले नाही. ही परीक्षेला बसू न देण्याची तिसरी वेळ आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पालकांनी शाळेमध्ये गोंधळ घातल्यामुळे मुलांची चालू परीक्षेचे सुरू असलेले पेपर झाल्यानंतर आजचा राहिलेल्या विषयाची परीक्षा घेतली जाईल असे आश्वासन प्रशासनाने दिले.

त्याच बरोबर येत्या १९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता याबाबत बैठक घेतली जाईल, लॉकडाऊन मध्ये घेतलेली वाढीव फी ही कमी करावी ही देखील मागणी यावेळी करण्यात आली. तसेच वाढीव फी पालकांच्या नावे दाखवली जात आहे ती कमी करावी. विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी, पालकांना विश्वासात घेऊन निर्णय करावे परस्पर निर्णय लागू नये अशा प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना जर वारंवार आपण परीक्षेला बसू देणार नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी प्रशासनाने वरील विषयांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ तसेच प्रलंबित पालकांचे विषय मार्गी लावू असे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर त्या ठिकाणी पालकांचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या प्राध्यापक, लीगल ॲडव्हायझर, शिक्षक, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभेचे अध्यक्ष संतोष नांगरे, मदन वाणी, प्रमोद कोठवळे, मंथन जागडे, राजू खैरे, चंद्रकांत गायकवाड, शिव घाडगे आदी उपस्थित होते.

क्लाईन मेमोरियल स्कुल ही अल्पसंख्यांक विनाअनुदानीत शाळा असून अनेक पालकांनी वर्षानुवर्षे शैक्षणिक शुल्क न भरल्याने किमान ४ कोटी रुपये बोजा निर्माण झाला आहे, अशा परिस्थितीत शाळेचे व्यवस्थापन, प्रशासन, दैनंदिन संचालन करणे अवघड असल्याने पालकांनी वस्तुस्थिती समजावून घेऊन शैक्षणिक शुल्क भरावे,असे आवाहन क्लाईन मेमोरियल स्कूलने आज पत्रकाद्वारे केले आहे .

आज बिबवेवाडी येथील शाळेच्या आवारात येऊन पालकानी ,राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकांची भेट देऊन शैक्षणिक शुल्क कमी करण्याचा आग्रह धरला. तसेच शैक्षणिक शुल्क थकलेल्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षेला बसू देण्याची विनंती केली.त्यावेळी प्राचार्या सुनंदा सिंग आणि संस्थेचे कायदे सल्लागार तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी एड. मार्कस देशमुख यांनी पालकांशी संवाद साधला.

कायद्याने प्रस्थापित शुल्क समितीने निर्धारित केलेले शुल्क च या शाळेतही आकारले जात आहे. वेळेत शुल्क भरण्याबाबत पालकांना २३ सप्टेबर रोजी शाळेने पूर्वसुचित केले होते, असे शाळेच्या प्राचार्या सुनंदा सिंग यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल शाळा संवेदनशील आहे, काळजी घेत आहे.मात्र, काही पालक जाणीवपूर्वक शैक्षणिक शुल्क भरत नाहीत आणि ते माफ करण्याचा आग्रह धरतात .दबाव आणतात आणि काही संघटनांना सोबत घेऊन आंदोलन करतात. शाळेचे प्रशासन आणि व्यवस्थापन, दैनंदिन कार्य सुरळीत चालवायचे असेल तर शैक्षणिक शुल्क भरणे अत्यंत गरजेचे आहे ,हे व्यवस्थापनाने आज पालकांना समजावून सांगितले आहे. आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी शाळेच्या प्राचार्या सुनंदा सिंग , संस्थेचे कायदे सल्लागार तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी अॅड.मार्कस देशमुख यांनी पालकांशी संवाद साधला.

त्याच बरोबर येत्या 19 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता याबाबत पुढील बैठक घेतली जाईल,असे यावेळी सांगण्यात आले.

 

Pune: Students Deprived Of Exams, NCP Creates Ruckus Against Kline Memorial School