पुणे: दुहेरी हत्याकांडाच्या संशयाची सुई पतीवर, महत्वाचे धागोदोरे पोलिसांच्या हाती

पुणे, १६/०६/२०२१: मायलेकराच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी संशयाची सुई बेपत्ता पतीवर असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यासंदर्भात पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. बेपत्ता आबिद शेख यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सात पथके रवाना झाली आहेत. खून करण्यात आलेला मुलगा आत्मवेंâद्री आजाराने ( ऑटिझमग्रस्त) त्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे. आयान शेख (वय ६) आणि आलिया शेख (वय ३५) असे खून झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.

शेख कुटूंब मुळचे मध्य प्रदेशातील असून २००७ पासून नोकरीनिमीत्त पुण्यात राहत होते. काही दिवसांपुर्वी ते धानोरीतून चNहोलीमध्ये रहायला गेले होते. आबिद शेख एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होते. मात्र, आत्मवेंâद्रीपणा आजार असलेल्या मुलाचा संभाळ करण्यासाठी त्यांनी अडीच वर्षापूर्वी नोकरी सोडली होती. मुलगा ऑटिझमग्रस्त असल्याचे लक्षात आल्यावर कुटूंब तणावात होते. मुलाला शिकवण्यासाठी घरी एक शिक्षीकाची नियुक्ती करण्यात आली होती. आलिया शेख यांचे वडिल मध्य प्रदेशात वनाधिकारी होते, तर आबिद शेख याचे वडिल जिल्हा योजना नियोजन वेंâद्रात अधिकारी होते. त्याचा भाऊ कॅनडामध्ये रहात आहे.

आबिदने ११ जूनला गाडी भाड्याने घेतली होती. त्यानंतर तो ११ते १४ जून पर्यंत सलग कुटूंबाला घरातून बाहेर घेऊन जात होता. सकाळी फिरायला गेल्यावर संध्याकाळी कुटूंबासह पुन्हा घरी येत होता. मात्र १४ जून रोजी आबिद कुटूंबाला घेऊन सासवड-दिवेघाट-बनेश्वर-बोपदेव घाट- दिवे घाटातून पुन्हा सासवडला गेला. तेथे त्याने रात्री साडेआठच्या सुमारास गाडीतच आलियाचा खून केल्याची शक्यता आहे. त्यानंतर आलियाचा मृतदेह सासवड पोलिसांना सापडला होता. आदिबने गाडी पुन्हा कात्रज- दत्तनगर चौक-कात्रज नवा बोगदा येथे नेली. तेथे मुलाचा खून करुन त्याचा मृतदेह टाकला असावा. यानंतर १५ जूनला पहाटे एक वाजता त्याने गाडी मार्केटयार्ड येथे सोडून स्वारगेटच्या दिशेने पायी चालत जाताना तो सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पत्नीला जबर मारहाण तर मुलाचा गळा आवळून खून
पोलिसांना गाडीमध्ये दोन लोखंडी पाईप सापडले असून मुलाचे कपडे व खाण्याचे साहित्य आहे. गाडीच्या मागच्या सीटवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. तसेच गाडीमध्ये तिघांव्यतिरीक्त आणखी कोणी नसल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. त्यामुळे संशयाची सुई आबिदकडे असल्याचे पोलिसांनी सांगितले. जोपर्यंत आबिद हाती येत नाही तोपर्यंत घटनेचा उलगडा होणार नसल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान शवविच्छेदनाच्या अहवालात आलियाला जबर मारहाण केल्याने आणि आयानचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.