पुणे, १६/०८/२०२२: सिगारेट व पाण्याच्या बॉटलच्या किंमतीवरून वाद झाल्यानंतर पान टपरी चालक व त्याच्या तीन कामगारांनी तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मध्यरात्री हा प्रकार ताडीवाला रस्त्यावरील जहांगिर रुग्णालयाच्या समोर घडला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी नौशाद जुबेर शेख (वय ३३), हुसेन जमाल खान (वय २१), वसीम सैय्यद (वय ३०) आणि कासीम नबी शेख (वय १९) यांना अटक केली आहे. याप्रकरणी स्वप्निल कांबळे (वय २३) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नौशाद याची जहांगिर रुग्णालयासमोर ग्राफीकॉन टॉवर शेजारी मंजुर पानशॉप आहे. त्याच्याकडे इतर आरोपी हे कामगार म्हणून काम करतात. स्वप्निल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत येथे सिगारेट व पाण्याची बॉटल घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यात पाण्याच्या बॉटलच्या किंमतीवरून वाद झाले. या आरोपींनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. भितीपोटी दुचाकी घेऊन स्वप्निल पळाला. पण, त्याच्या दुचाकीची चावी त्याचठिकाणी पडली. त्यामुळे तो पुन्हा मित्रांसोबत अडीचच्या सुमारास चावी घेण्यासाठी आला. तर, आरोपींनी त्याला तु परत आला का, असे म्हणत त्याच्यासह मित्रांना लाकडी दांडक्याने तसेच लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यात तिघेजन जखमी झाले आहेत.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा