पुणे: लोणावळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने होणार पाण्याचा अनियंत्रित विसर्ग, टाटा पॉवर तर्फे नागरिकांना सतर्कतेची सूचना

लोणावळा, १३ जुलै २०२२ : लोणावळा धरण परिसरात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील २४ तासात धरणाच्या सांडव्यावरून अनियंत्रीत स्वरुपाचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने, परिसरातील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा टाटा पॉवर’ चे धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी परिसरातील नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

लोणावळा जलाशयातील पाण्याची पातळी ७.८५ दलघमी (६६.९९%) असून, बुधवारी सकाळी ७:०० ते १०:०० यावेळेत परिसरात ७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुलढील २४ ते ३६ तासांत धरणाच्या सांडव्यावरून अनियंत्रीत स्वरुपाचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन मुन्नोळी यांनी केले आहे.