पुणे: लाचेची मागणी केल्याप्रकरणी कर निरीक्षक जाळ्यात

पुणे, दि. २९/०८/२०२२ – मिळकत कर नावावर करून देण्यासाठी व जुना मिळकतकर न लावण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील कर विभागाच्या विभागीय निरीक्षकाला लाचलुचपत विभागाने अटक केली. संजय बबन काळे (वय.45, रा.पुणे) असे निरीक्षकाचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

 

तक्रारदार यांच्या इमारतीचा मिळकत कर त्यांच्या नावावर करून देण्यासाठी व जुना मिळकत कर न लावण्यासाठी विभागीय निरीक्षक काळे याने 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. काळेने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध सोमवारी लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल अटक केली.