पुणे: तिघांचा संगनमताचा डाव फसला, तब्बल २ कोटींची रोकड जप्त

पुणे, दि. १४/११/२०२२ – पैशांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या उपव्यवस्थापकानेच पदाचा गैरवापर करीत तब्बल दोन कोटींची रोकड साथीदारांच्या मदतीने कंपनीला देण्याचा प्रयत्न केला. संबंधित कंपनीकडून चॅरिटेबल संस्थेच्या नावे अधिकची देणगी प्राप्त करून विभागून घेणे तिघांच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट चारने तिघांना अटक करीत त्यांच्याकडून दोन कोटींची रोकड जप्त केली आहे.

अमोल गोरखनाथ कंचार (वय ४५ रा.गारखेडा परिसर, संभाजीनगर), संतोष वैजनाथ महाजन (वय ४३ रा. नाशिक) आणि सुशिल सुरेश रावले (वय ३४ रा. मंचर, ता. आंबेगांव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मोटारीतून बनावट नोटांची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती युनीट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांना मिळाली. पथकाने सापळा रचून मोटारीचा पाठलाग करून वॅâम्पमधील वेलस्ली रस्ता भागात अडविले. मोटारीत पाहणी केली असता त्यामध्ये ५०० आणि दोन हजार रूपये दराच्या नोटांचे दोन कोटींची रोकड आढळून आली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेत पथकाने चौकशी केली. आरोपी सुशील रावले हा (बॅक ऑफ महाराष्ट्र मंचर करंन्सी चेस्ट ता. आंबेगाव) येथे डेप्युटी मॅनेजर म्हणुन कार्यरत आहे. त्याने पदाचा गैरवापर करुन मंचर करंन्सी चेस्टमधुन दोन कोटींची रक्कम अनधिकृतपणे ताब्यात घेतली. संबंधित रोकड खासगी वंâपनीला देउन त्यांच्याकडून सीएसआरची मोठी रक्कम आरोपी अमोलच्या ‘‘कंचार फौडेशन’ चॅरीटेबल ट्रस्टच्या खात्यात आरटीजीएस करुन घेणार होते. देणगी स्वरूपात मिळालेल्या जास्तीच्या रक्कमेपैकी काही रक्कम ते आपआपसात वाटुन घेणार होते. उरलेल्या रक्कमेमधुन आरोपी अमोल हा शिक्षण संस्थेच्या इमारतीचे बांधकाम करणार होता.

आरोपी संतोष महाजन सर्वोतोपरी मदत करीत असल्यामुळे शिक्षण संस्थेच्या बांधकामाचा ठेका आणि डोनेशनमधील रोकड त्यालाही मिळणार होते. देणगीतून मिळालेली दोन कोटींची रक्कम अमोल बँक ऑफ महाराष्ट्राच्या मंचर शाखेत आरटीजीएस करणार होता. मात्र, युनीट चारने त्यांचा भांडाफोड करून रोकड जप्त केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णीक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक गणेश माने, एपीआय विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, हरिष मोरे, संजय आढारी, प्रविण भालचीम, विठ्ठल वाव्हळ, अजय गायकवाड, नागेशसिंग कुँवर, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, सारस साळवी, अशोक शेलार, रमेश राठोड, मनोज सांगळे, वैशाली माकडी, शितल शिंदे यांनी केली.