पुणे: दोन दिवसीय ‘डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल’ चे शानदार उद्घाटन

पुणे, २६/११/२०२२: ‘दकनी अदब फाऊंडेशन’ तर्फे आयोजित   ‘डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल’ चे  शानदार उद्घाटन   २६ नोव्हेंबर रोजी सकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे झाले. २६,२७ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या या दोन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये साहित्य,कविता, नाट्य, चर्चा,संगीत अशा बहुरंगी,बहु आयामी, बहुभाषिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.फेस्टिव्हलचे हे तिसरे वर्ष आहे.

अभिनेते- कवी  पियुष मिश्रा, पद्मश्री मालिनी अवस्थी,सुहास दिवसे, अमिताभ गुप्ता, सलीम अरिफ, भारत सासणे, युवराज शहा,मोनिका सिंह,आणि मान्यवरांच्या हस्ते २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन कार्यक्रम झाला.मोनिका सिंह लिखित ‘बात बाकी है ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्घाटन समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

फेस्टिव्हलच्या मार्गदर्शक मोनिका सिंह,संचालक जयराम कुलकर्णी,मनोज ठाकूर,रविन्द्रपाल तोमर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

पुणेकर रसिकांना  भारतभरातील काव्य-संगीत-नाट्य-साहित्य विषयक दिग्गजांच्या आविष्कारांचा आनंद घेता यावा, अशी दोन दिवसांच्या कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे.मराठी,हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषात विविध कार्यक्रम होणार आहेत.

बालगंधर्व रंगमंदिर  येथे दोन्ही दिवस या फेस्टीव्हलचे विविध कार्यक्रम होत आहेत.

उद्घाटन कार्यक्रमात पियूष मिश्र, पद्मश्री मालिनी अवस्थी, भारत सासणे, अमिताभ गुप्ता,सुहास दिवसे,मोनिका सिंह,सलीम अरिफ, मनोज ठाकूर, युवराज शहा, जयराम कुलकर्णी,रवी तोमर उपस्थित होते. सुहास दिवसे, अमिताभ गुप्ता यांनी मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या.

भारत सासणे म्हणाले, ‘आवश्यक सुविधांबरोबर समाजाला उत्सवाची आवश्यक असते. त्यात सांस्कृतिक गोष्टीचा समावेश केला पाहिजे. देशभरात असे मोठे सांस्कृतिक महोत्सव होत असतात. ज्या  दिशेला कलेचा जागर होत असेल, तो मार्ग योग्य दिशेने जात असतो ‘.

मालिनी अवस्थी म्हणाल्या, ‘कलाकारांसाठी पुणे ही जणू काशी आहे. इथे कला सादर करणे, ही कलाकारांची इच्छा असते.कारण, इथल्या प्रशंसेला प्रतिष्ठा आहे ‘.

‘नवी पिढी काय आविष्कार करतात, काय विचार करतात, हे समजून घेण्यासाठी मी विविध शहरे फिरतो ‘, असे पियूष मिश्रा यांनी सांगीतले.

प्रसिद्ध लेखिका शोभा डे,पद्मश्री मालिनी अवस्थी(संगीत),अभिनेते मकरंद देशपांडे(अभिनय),अभिनेते-कवी पियुष मिश्रा(काव्य),रिचा अनिरुद्ध(सूत्रसंचालक),अभिनेत्री सोनाली कलकर्णी,कव्वाली गायिका  नूरन भगिनी,वसीम  बरेलवी,खुशबीर सिंह  शाद(कवी),कुंवर रणजित सिंह  चौहान,किशोर कदम(सौमित्र), कविता काणे,सुधा मेनन असे ६३  हून अधिक कलाकार,साहित्यिक,गायक,पटकथा लेखक,कवी  या फेस्टीव्हल मध्ये सहभागी होत आहेत.

‘दिल से ..पीयूष ! ‘ कार्यक्रमात  सलीम अरिफ यांनी पीयूष मिश्रा यांच्याशी साधलेला संवाद , ‘सो कूल ..सोनाली ! :सोनाली कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद, प्रिय भाई ..एक कविता हवी आहे !(मुक्ता बर्वे यांचा समावेश असलेले पूल आणि सुनीता देशपांडे यांच्या सहजीवनावरील अभिवाचन ) असे अनेक कार्यक्रम पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आले होते. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

सायंकाळी ‘मत लैय्यो चुनरी हमार ‘ :पद्मश्री मालिनी अवस्थि लोकनृत्य आयोजित करण्यात आले होते.

रात्री ८.३० ते ११ दरम्यान ‘रंग ‘ -मुशायरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वासिम बरेलवी,फरहात एहसास,खुशबीर सिंह शाद,मोनिका सिंह कुंवर रणजित चौहान यांच्या सह अनेक मान्यवर सहभागी झाले.

डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल :रविवारी रंगारंग  कार्यक्रम

सकाळी ११ ते १२ : ‘ थ्रु कॉरीडॉर  ऑफ बुकस्’ :आलिफिया खान यांनी लेखिका सुधा मेनन , कविता काणे आणि मोनिका सिंग यांच्याशी साधलेला संवाद

दुपारी १२ ते १ :इनक्रेडिबल ते अन्स्टोपेबल:             शोभा डे आणि सुधा मेनन

दुपारी १ ते २ या वेळेत जाहिरात लेखन ते पटकथा लेखन या विषयी कमलेश पांडे – सलीम अरीफ यांचा संवाद

दुपारी २.३० ते ३.३० :’आणि तरिही … सौमित्र ! ‘:सहभाग किशोर कदम आणि सुरेशकुमार वैराळकर

सायंकाळी ५ ते ७.३०: हिंदी नाटक ‘ सर सर सरला ‘ :मकरंद देशपांडे आणि सहकारी

रात्री ८ वाजता: सूफी संगीत आणि कव्वाली – नूरान भगिनी

यापूर्वी गुलाम मुस्तफा खान,दीप्ती नवल, आरती अंकलीकर-टिकेकर,कुमार विश्वास,सचिन खेडेकर,विशाल भारद्वाज, सुबोध भावे,निझामी बंधू,अशा अनेक मान्यवरांनी या फेस्टिव्हल मध्ये हजेरी लावली आहे. कोरोना साथीच्या काळात २०२१ मध्ये हा फेस्टिव्हल होवू शकला नव्हता.

फेस्टीव्हल सर्वांसाठी खुला असला तरी प्रवेशासाठी ऑनलाईन
नोंदणी https://deccanlitfest.com//  संकेत स्थळावर करावी लागणार आहे, अशी माहिती जयराम कुलकर्णी यांनी दिली.