पुणे,दि.२७/०७/२०२२: बालविवाह रोखण्याविषयक जनजागृतीच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असून, जिल्ह्यात बालविवाहाच्या तक्रारी नोंदविण्याचे प्रमाण वाढलेअसल्याची नोंद पुणे जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आली आहे.
बालविवाह रोखण्यासाठी सर्वप्रथम त्याची तक्रार नोनादाविणे आवश्यक असते. मात्र अनेकदा नागरीकांकडून ती केली जात नाही. ही बाब लक्षात घेत, पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रामपंचायतींची बैठक घेत, त्याबाबत जनजागृती केली होती. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, जिल्ह्यात बालविवाहाच्या तक्रारी नोंदविण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे. यासाठी पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड शहर पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले. आगामी काळात परिषदेतर्फे आशा आणि आंगणवाडी सेविका यांना बालविवाह रोखण्यासाठी विविध समुदायांसोबत काम करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
बालविवाह आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी योग्य प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस पाटलांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
या ठिकाणाहून बालविवाहाच्या तक्रारी : इंदापूर, शिरुर, लोणावळा, निघोज पारनेर, खेड, मुळशी, लोणावळा, मावळ, उरली कांचन, मांजरी, शिवणे, तळेगाव दाभाडेनगर, तळेगाव- मावळ, जुन्नर, आळंदी देवाची, सुपे, पुरंदर, दौंड,बारामती, हडपसर, कोंढवा
More Stories
उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रमांचे आयोजन
विश्वकर्मा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ध्वजारोहण संपन्न