पुणे: धानोरी-लोहगाव रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडविला

पुणे, २९ मे २०२१: धानोरी ते लोहगाव कडे जाणाऱ्या रस्तावर (मोझे शाळेला लागून व स्पेल्नडिड सोसायटीच्या समोर) प्रत्येक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून रस्ता पूर्णपणे बंद होत होता तसेच या भागात असणाऱ्या अनेक सोसायटी मधील लोक या वेळेस साचलेले पाणी ओसरेपर्यंत बाहेर किंवा

आत ही येऊ शकत नव्हते. याची दखल घेता पुणे महानगरपालिका आयुक्तांशी वडगाव शेरी चे आमदार सुनील टिंगरे यांनी बोलून त्वरीत मोठ्या व्यासाची २४ इंची पावसाळी पाईपलाइन टाकण्याचे सांगितले त्याच कामाचे भूमिपूजन मागील वर्षी करण्यात आले होते. तसेच या समस्याचा संबंध भारतीय वायुसेना (एयरफोर्स) च्या भिंती लगत व आतल्या बाजूस नाला असल्याने  स्वतः सुनील टिंगरे यांनी एअर फोर्सच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी खेरा यांच्याशी बैठक करुन संरक्षण भिंतीच्या आतील कामे करण्याची विनंती केली होती. या वर त्यांनी फार सकारात्मक पणे परवानगी देऊन समस्याचे कायमस्वरूपी उपाय म्हणून दखल घेतली.

“सदर पावसाळी लाईन ही लोहगाव बस स्टॉपच्या दिशेने जाऊन तेथील मुख्य पावसाळी लाईन ला जोडण्यात येणार आहे. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी हे काम लवकरच पूर्ण होणार असून नक्कीच येथील राहणारे व प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल अशी खात्री बाळगतो” असे आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले.