December 2, 2025

पुणे: शॉपी मॅनेजरकडून साडेसहा लाखांवर मोबाइलची चोरी

पुणे, दि. २०/०९/२०२३: मोबाइल शॉपी मॅनेजरसह दोघांनी दुकानातील तब्बल ६ लाख ७८ हजारांच्या महागड्या मोबाइलची चोरी केली. ही घटना १ जानेवारी ते २८ ऑगस्ट कालावधीत सदाशिव पेठेत शॉपीत घडली आहे. याप्रकरणी आशिष शर्मा (वय ५८ रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष यांची सदाशिव पेठेत मोबाइल शॉपी असून त्याठिकाणी आरोपी मॅनेजर कामाला होता. जानेवारी ते ऑगस्ट कालावधीत मॅनेजरने आशिष यांची नजर चुकवून शॉपीतून विविध कंपन्यांचे ८ मोबाइल चोरून नेले. बाजारपेठेत मोबाइलची किंमत ६ लाख ७८ हजार रूपये आहे. चोरलेले मोबाइल त्याने ओळखीतील मित्रांना विकल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बरूरे तपास करीत आहेत.