पुणे, ०६/०८/२०२१: एस टी चालकाला पाटस टोल नाक्याजवळ अडवून पोलीसाची बतावणी करीत कुरियरसह सोन्या-चांदीच्या ऐवजाची ने-आण करणाऱ्या चौघांची १ कोटी ५५ लाखांची रोकड लुटणाऱ्या त्रिकुटाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.
त्यांच्याकडून रोख ८५ लाख ५२ हजार, सोन्याचे दागिने ७ लाख ५० हजार आणि वाहने मिळून १ कोटी ५४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रामदास भाऊसाहेब भोसले (वय ३०), तुषार बबन तांबे (वय २२, दोघेही रा. वरुडे, शिरूर) आणि भरत शहाजी बांगर (वय ३६ रा. गणेगाव खालसा, शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लातूरहून मुंबईच्या दिशेने मंगळवारी (दि. ३) मध्यरात्रीच्या सुमारास चाललेल्या एसटी चालकाला पोलीस असल्याची बतावणी करून चौघांनी पाटस टोलनाक्याजवळ अडविले. त्यानंतर पासद्वारे प्रवास करणाNया फक्त चार प्रवाशांना बाहेर बोलावून घेत चोरट्यांनी एसटी चालकाला मार्गस्थ होण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी संबंधित प्रवाशांना आम्ही पोलिस आहोत, तुमच्याकडील ऐवज चोरीचा असल्याचे सांगून १ कोटी १२ लाख ३७ हजारांचा काढून घेत मोटारीतून पळ काढला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणासह सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम करण्यात येत होते तपासात भोसले भावडांसह साथीदारांनी प्रवाशांची लुट केल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने सापळा रचून आरोपी रामदास भोसले, तुषार तांबे, भरत बांगर यांना खराडी बायपास परिसरात ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. लुट केल्यानंतर अवघ्या ७२ तासांमध्ये पथकाने आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत. आरोपींनी रक्कम खर्च करण्याआधी त्यांच्याकडून गुन्ह्यातील १ कोटी ५५ हजारांचा ऐवज परत मिळविण्यात आल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
लुट केल्यानंतर आरोपींनी रोकड उसाच्या शेतातील विहीरीच्या दगडांमध्ये लपवून ठेवली होती. संबंधित रक्कम, मोटार, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, एपीआय सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, शब्बीर पठाण, राजू मोमीण, जर्नादन शेळके, अनिक काळे, रविराज कोकरे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, विजय कांचन, गुरू जाधव, धीरज जाधव, बाळासाहेब खडके, दगडू विरकर, काशीनाथ राजापुरे यांनी केली.
More Stories
बेकायदेशीरपणे हुक्का पार्ट्यांचे आयोजन करणा-या बड्या हॉटेल्स आणि बारवर पोलिसांकडून कारवाई; तीन जणांविरुद्ध गुन्हा तर सुमारे 90 हजाराचा मुद्देमाल जप्त
डिएगो ज्युनियर्सचे अपराजित्व कायम, युपीएसएवर सहज विजय
एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अजमीर शेख, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद