पुणे, २५/०८/२०२१: शहरातील वेगवेगळ्या अपघातत तीन जणांचाा मृत्यू झाला. सहकारनगरमधील तळजाई टेकडी परिसर रस्ता, वाघोलीतील भावडी रस्त आणि खांदवेनगरमध्ये अपघात झाले आहेत. याप्रकरणी सहकारनगर आणि लोणीवंâद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव रिक्षाचालकाने दिलेल्या धडकेत अनोळखी पादचारी ठार झाला. हा अपघात २३ ऑगस्टला रात्री पावणेनउच्या सुमारास सहकाननगरमधील तळजाई टेकडीवरून बिकानेर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. याप्रकरणी पोलीस हवालदार अनिल मेगडे यांनी तक्रार दिली आहे. दुसऱ्या अपघातात दुचाकीस्वार दगडाला धडवूâन ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास वाघोलीतील भावडी रस्त्यावर घडली. बबन अच्युतराव मोहिते (वय ७२ रा. जाधव वस्ती, वाघोली ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. मोहिते दुचाकीवरून कामाला जात असताना त्यांची गाडी दगडावर गेली. त्यामुळे झालेल्या अपघातात खाली पडल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
विरूद्ध दिशेने ट्रक चालवित पीकअपला धडक दिल्यामुळे चालक ठार झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास वाघोलीतील खांदवेनगर परिसरात घडला. विकास व्यंकटराव जिरगेकर (वय २३, रा. न्हावरे, शिरूर) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाउ अविनाश जिरगेकर (वय २५) यांनी लोणीवंâद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
More Stories
जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांना राष्ट्रीय पुरस्कार
पुण्यात पोलीस ठाण्यातच महिलेने प्यायले फिनाईल, आयुक्तालयानंतर कोंढव्यात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे: हनीट्रॅपमध्ये अडवून खंडणी उकळणाऱ्या टोळीने केली अनेकांची फसवणूक
जिल्ह्यातील सात ते आठ जणांना लाखोंचा गंडा घातल्याचे उघडकीस