पुणे: भरदिवसा तरूणाचा मोबाइल हिसकाविला, तिघांना अटक

पुणे, ०८/०७/२०२२: भरदिवसा तरूणाच्या हातातील २० हजारांचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना ७ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयानजीक बसस्थानकात घडली. याप्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपुर्वी त्याच ठिकाणाहून मोबाइल हिसकाविल्याची घटना घडली होती. त्यामुळे मोबाइल हिसकाविण्याच्या घटनांमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

श्रेयस चांडोळकर (वय २० रा. टिंगरेनगर ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास श्रेयस हे जिल्हाधिकारी बसस्थानकाजवळ थांबले होते. त्यांनी मित्राला फोन करण्यासाठी मोबाइल हातात घेतल्याची संधी साधून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील २० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. बसची वाट पाहत थांबलेल्या तरूणाच्या हातातील २० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तिघा सराईत चोरट्यांना अटक केली. मागील काही दिवसांपुर्वी चोरट्यांनी त्याच ठिकाणाहून मोबाइल हिसकाविल्याची घटना घडली होती.