पुणे: आयआयएसईआर मधील प्राध्यापकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, अभावीपचे आंदोलन

पुणे, ९ जानेवारी २०२३: आयआयएसईआर मध्ये पीएचडी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे संशोधन चोरलेच शिवाय तिच्याकडे चित्रविचित्र मागण्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करायला भाग पाडल्याने प्राध्यापकाच्या विरोधात आणि संस्था प्रशासनाचे विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने चोर भगाव आंदोलन करत कारवाईची मागणी केली. पुण्यातील एका प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडल्याने गुणवत्तेसह मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आयआयएसईआर, येथील विद्यार्थिनी गरिमा अगरवाल ची शैक्षणिक फसवणूक करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. गरिमा ही अतिशय हुशार विद्यार्थिनी, दिल्लीतून तिच्या शिक्षणासाठी पुण्यात आली. प्राध्यापकाने स्वता:च्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे तिला नाहक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून गरिमा ने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या विषयात पीडितेला न्याय मिळावा व प्राध्यापकासारख्या पवित्र भूमिकेला काळीमा फासणार्या प्राध्यापकाला शिक्षा मिळावी म्हणून अभाविप ठाम भूमिका घेत आहे.
 गरिमा अगरवाल ने मागील ६ वर्षांत खडतर संघर्ष करून तिचा पीएचडी चा शोध निबंध पूर्ण केला. परंतु, पीएचडी मार्गदर्शक अनिध्य गोस्वामी (प्राध्यापक) तिच्या पुढे काही विचित्र मागण्या केल्या. त्या मागण्या पूर्ण न केल्याने संबंधित प्राध्यापकाने गरिमा चा शोध एका दुसऱ्या विद्यार्थिनी च्या नावाने जमा केला. प्राध्यापक अनिध्य गोस्वामी इथेच थांबले नाहीत तर त्यांनी त्यापुढे ही पीडितेला वारंवार मानसिक त्रास दिला. या सर्वाच्या विरोधात पीडित विद्यार्थिनी ने सतत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या तक्रारीकडे दूर्लक्ष करण्याचे काम आय. आय. एस. ई. आर, पुणे प्रशासनाने केले. या सर्व नाहक त्रासाला कंटाळून अखेर गरिमाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. यानंतर देखील संबंधित प्रशासनाने या विषयात काही विशेष लक्ष दिले नाही. विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते जेव्हा संबंधित प्रशासनाला भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांना जाणूनबुजून कारणे देऊन टाळण्यात आले. या विषयाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटीला गेले व त्यांना या विषयातील निवेदन दिले.
गरिमा च्या संघर्षाला न्याय मिळावा, तिची पी एचडी लवकरात लवकर पूर्ण करून द्यावी, तसेच या विषयातील दोषी प्राध्यापक डायरेक्टर जयंत उदगावकर, गिरीश रत्नपारखी, पोतदार व मुख्य आरोपी डॉ. अनिध्य गोस्वामी यांच्या विरोधात कडक कारवाई करावी व त्यांची आय. आय. एस. ई. आर, पुणे मधून हकालपट्टी करावी, त्याचसोबत गरिमा चा शोध स्वताच्या नावाने प्रकाशित करून दुसऱ्या च्या मेहनतीने डिग्री मिळवणारी विद्यार्थिनी सृष्टी गुप्ता वर देखील कारवाई करावी व चुकीच्या पद्धतीने मिळवेलीली डिग्री रद्द करून तिला देखील योग्य ती शिक्षा प्रशासनाने करावी अशी मागणी या आंदोलनात अभाविप करत आहे असे अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी सांगितले.