पुणे: मेट्रो स्टेशनच्या कामांसाठी कल्याणीनगरमध्ये 9 ऑक्‍टोबरपर्यंत टवाहतुकीत बदल

पुणे, 9 जुलै 2021: कल्याणीनगर परिसरातील ऍडलाब चौक ते एन.एम चव्हाण चौक सध्या सुरू असलेल्या मेट्रो स्थानकासाठी 10 जुलै ते 9 ऑक्‍टोबर दरम्यान वाहतुक मार्ग वळविण्यात येणार आहे, अशी माहिती येरवडा वाहतूक विभागाने दिली आहे.

याबाबत वाहतुक उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिला आहे. या आदेशानुसार कोरेगाव पार्क ते बिशप स्कूल (कल्याणीनगर) पर्यंत जाणारी वाहतूक एनएमसी चौकात बंद ठेवण्यात येणार आहे. बिशप स्कूल ते कोरेगाव पार्ककडे जाणारी वाहतूक ऍडलाब चौक येथे बंद राहील. या बदलांमुळे वाहनधारकांना पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे. बिशप स्कूल वरून कोरेगाव पार्ककडे जाणारी वाहने कल्याणीनगर लेन क्रमांक 7 मार्गे गोल्ड अदलाब चौक येथून उजवीकडे वळतील. तर कोरेगाव पार्क एबीसी चौक ते बिशप शाळेकडे जाणारी एनएमसी चौक वरून चव्हाण चौकात डावीकडे व कल्याणी नगर लेन क्र. 8 येथून गोल्ड अदलाब चौक येथे जातील.