उत्तमनगरध्ये तृतीयपंथीचा राडा, महिलेला मारहाण करून फाडले कपडे

पुणे, दि. ४ (प्रतिनिधी)-  शहरातील उत्तमनगर परिसरात एका तृतीयपंथीयाने महिलेला मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम घेउन मारहाण केली. त्यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे कपडे फाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार काल सकाळी सातच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी ४०  वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी सातच्या सुमारास एका तृतीयपंथीने भाजी विक्री दुकानासमोर बसलेल्या महिलेकडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय त्यांना मारहाणही केली. त्यामुळे त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केल्याचा राग तृतीयपंथीला आहे. त्यामुळे तृतीयपंथीने मध्यस्थी करणाNया महिलेचे कपडे फाडून त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील २५० रूपये घेउन पोबरा केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत. दरम्यान, दिवसाढवळ्या तृतीयपंथीने घातलेल्या राड्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.