पुणे: इन्स्टाग्रामचा वापर केला चरस गांजा विक्रीसाठी, दोघांना अटक

पुणे, २०/११/२०२२: अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी तस्कर कोणती नामी शक्कल लढवतील याचा नेम राहिला नाही. अशाच पद्धतीने इस्टाग्रामचा वापर करीत मेफेड्रॉन, चरसची विक्री करणाऱ्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्यांच्याकडून मेफेड्रॉन, चरस अमली पदार्थांसह मोबाइल, इतर ऐवज मिळून २ लाख १५ हजारांचे साहित्य जप्त केले आहे.

 

आकाश महेंद्र ठाकर (वय २२ रा. आनंदनगर हिंगणे ) आणि अनिकेत जनार्दन धांडेकर (वय २० रा. सिंहगड रोड, हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

सोशल मीडियाचा वापर करून दोघेजण सिंहगड ठाण्याच्या हद्दीत मेफेड्रॉन आणि चरसची तस्करी करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून आकाशकडून ४८ हजारांचे चरस, मोबाइल दुचाकी जप्त केली. अनिकेतकडून ८७ हजारांचे मेफेड्रॉन, मोबाइल असा ऐवज जप्त केला.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, एपीआय शैलजा जानकर, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली.