पुणे, २६/७/२०२१ -शहरातील डावी भुसारी कॉलनी श्रीगणेश अपार्टमेंट आणि दत्तनगरमधील साई लुकवड रेसिडेन्सीमधील फ्लॅटमध्ये चोरट्यांनी घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही घटनेत १ लाख १५ हजारांचा ऐवज चोरीला गेला.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर परिसरात असलेल्या साई लेकवुड रेसीडन्सीमधून चोरटयांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून सोन्याचे दागिने रोकड असा ८९ हजार रूपयांचा ऐवज चारून नेला. दिपीका संजय तुळसकर (वय ४४, रा. दत्तनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २४ जुलै रोजी सकाळी उघडकीस आला. याबाबत अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . कोथरूड येथील डावी भुसारी कॉलनीतील अक्षय आनंदराव पाटील (वय २८, रा. मोकाटेनगर, श्रीगणेश अपार्टमेंट) यांच्या खोलीचा दरवाजा उघडून चोरट्यांनी बॅग, लॅपटॉप, मोबाईल असा २६ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
More Stories
पुणे: सिव्हील सर्जनसह दोन वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पुणे: उपायुक्तांकडे कोट्यावधीचे घबाड, एसीबीकडून दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे