पुणे: खूनाच्या प्रयत्नात फरारी दोघांना अटक; लोणीकंद पोलिसांची कामगिरी

पुणे, २७ जुन २०२१- शहरातील दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरूणाच्या खुनाचा प्रयत करून मागील अडीच महिन्यांपासून फरार असलेल्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. आदित्य राहुल चव्हाण (वय १९), आणि अक्षय रमेश नवले (वय २० दोघेही रा.जनता वसाहत,पर्वती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लोणीकंद पोलिस पेट्रोलिंग करीत असताना दत्तवाडी गुन्ह्यातील दोघे आरोपी उबाळेनगर परिसरात असल्याची माहिती पोलीस नाईक कैलास साळुंखे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे यांच्या पथकाने सापळा रचून आदित्य आणि अक्षय याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी अक्षय याने मार्केटयार्ड परिसरात जबरी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, तपास पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सुरज गोरे, मोहन वाळके, कैलास साळुंके, अजित फरांदे ,विनायक साळवे , समीर पिलाने, सागर कडू, बाळासाहेब तनपुरे यांनी केली.