पुणे, दि. ०४/०१/२०२३ – कोयत्याच्या धाकाने नाना पेठ परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्या आणखी दोघांना युनीट एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून कोयता, पालघन, सुरा असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. याआधी पाचजणांच्या सराईत टोळीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी सहाच्या सुमारास नवावाडा परिसरात घडली होती.
दहशत निर्माण करण्यासाठी सराईत टोळीने हातात कोयते आणि सुरा घेउन नानापेठेतील नवावाडा परिसरात राडा घातला होता. कोयते नाचवित आरडाओरड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी गुन्ह्याचा समांतर तपास युनीट एक करीत होते. कोयता गँगमधील दोघे आरोपी नारायण पेठेतील मंदीरालगत लपल्याची माहिती पोलिस अमलदार अजय थोरात आणि निलेश साबळे यांना मिळाली. पथकाने सापळा रचून मयूर आणि सुजल याच्यासह अल्पवयीनाला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे , उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, निलेश साबळे, दत्ता सोनवणे, विठ्ठल साळुंखे, तुषार माळवदकर, रूक्साना नदाफ यांनी केली.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा