पुणे, ०७/०७/२०२२: घरगुती वादातून पतीने पत्नीसह दोघांवर वार करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना ५ जुलैला साडेपाच वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील डोमखेल रस्त्यावर घडली.
विद्या पारस कनोजिया (वय २५ रा. वाघोली ) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पारस कनोजिया, अजय कनोजिया, रितीक परदेशी, विकी कनोजिया (सर्व रा. नगर), प्रणाली भिंगारदिवे (रा. निंबोडी, नगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या आणि पारस पती-पत्नी असून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू आहेत. ५जुलैला विद्या आणि त्यांचा मित्र निखील धुलिया वाघोली परिसरात थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या पारस आणि इतर साथीदारांनी विद्यावर वार करून जखमी केले. त्याशिवाय निखीललाही मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आरोपी दुचाकीवर बसून पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक निखील पवार तपास करीत आहेत.
More Stories
उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रमांचे आयोजन
विश्वकर्मा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ध्वजारोहण संपन्न