पुणे, दि. ०१/०१/२०२३- किरकोळ कारणावरून टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना ३१ डिसेंबरला कसबा पेठेत घडली असून आरोपी पसार झाले आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यश पिंगळे आणि केदार कुंभार (वय १८ रा. कसबा पेठ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी केदारने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार आणि यश ३१ डिसेंबरला अगरवाल सोसायटीपरिसरात मोबाइलवर गेम खेळत बसले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या टोळक्याने केदारसोबत विनाकरण भांडणे केली. तु रोहितचा मित्र आहेस ना, तुला आज खल्लास करतो असे म्हणत त्याला कोयता फेकून मारून जखमी केले. त्याचवेळी परिसरातून रोहित दरेकर चालला होता.

त्यावेळी टोळक्याने त्याचा पाठलाग करून आज तुझा मर्डरच करतो असे म्हणत कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा