पुणे: दुचाकी गाडया भाडयाने घेऊन विकणाऱ्याला अटक; १० दुचाकी जप्त, स्वारगेट पोलीसांनी केला पर्दाफाश

पुणे, दि. ३१/०८/२०२२- भाडेतत्वावर वेगवेगळ्या ठिकाणावरुन दुचाकी गाडया भाडयाने घेवुन परस्पर विक्री करणाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून साडे तीन लाख रुपयांचया १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

संबंधित दुचाकी फायनान्स कंपनीकडुन विकत घेतल्याची बतावणी करून त्याने विक्री केली होती.

 

खोजेमा अबीद हुसेन सदरीवाला (रा. गेरा विहार सोसा. विमाननगर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फैजान जावेद बागवान यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

आरोपी खोजमाने फैजाणला फायनान्स कंपनीकडून दुचाकी घेतल्याची बतावणी करून दुचाकींची विक्री केली होती. ३० दिवसांमध्ये कागदपत्रे आणुन देतो असे सांगुन त्याने कंपनीच्या गाड्याची परस्पर विक्री केली होती. खोजमा वारंवार फिर्यादीना वेगवेगळे कारणे सांगुन कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करीत होता. फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

 

आरोपी खोजमा विमाननगर मध्ये येणार असल्याबाबतची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे आणि पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांना मिळाली होती. त्यावरुन त्याला गेरा विहार सोसायटी विमाननगर येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १० दुचाकी जप्त केल्या. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, एपीआय प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, मुकुंद तारु, सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड, किरण भरगुडे, फिरोज शेख, संदीप घुले, रमेश चव्हाण, अनिस शेख, दिपक खेंदाड, प्रविण गोडसे यांनी केली आहे.