पुणे – केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते मल्टीलेवल पार्किंगचे उद्घाटन: खासदार गिरीश बापट

पुणे दि.२३/११/२०२२: केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री  ज्योतिरादित्य सिंधियाजी यांच्या हस्ते पुणे विमानतळावरील मल्टीलेवल पार्किंगचे दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता उद्घाटन होणार असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.

यावेळी बोलताना खासदार बापट यांनी सांगितले की पुणेकर आणि पुणे विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना वाहनतळाचा प्रश्न भेडसावत होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी विमानतळा लगत मल्टीलेवल पार्किंग उभारण्यात आले. या वाहनतळामुळे प्रवाशांना विमानतळावर पार्किंगच्या सुविधेबरोबर इतर सुविधाही उपलब्ध होणार आहे. या वाहनतळाचे काम तातडीने पूर्ण करून ते नागरिकांकरिता उपलब्ध करून देणे गरजेचे होते. म्हणून मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो. सप्टेंबर २०२२ मध्ये सिंधियाजी हे पुणे दौऱ्यावर आले असता त्यांना या वाहनतळाच्या उद्घाटनाकरीता वेळ देणेसाठी विनंती केली असता त्यांनी उद्घाटनाकरिता वेळ देणेबाबत होकार दर्शविला. सद्यस्थितीत वहानतळाचे सर्व काम पूर्ण झाले असल्यामुळे दिनांक 25 नोव्हेंबर २०२२ रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सिंधिया जी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रकांत दादा पाटील, राज्यसभा खासदार श्रीमती वंदना चव्हाण, वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार  सुनील टिंगरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले.

विमानतळावरील पार्किंगचा ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या मल्टीलेवल पार्किंगचे काम तातडीने पूर्ण करणे माझ्या दृष्टीने गरजेचे होते. काही अपूर्ण असलेल्या बाबी पूर्ण करून घेतल्यामुळे या वाहनतळाचे उद्घाटन दिनांक 25 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्र्याचे हस्ते होणार आहे.