वसतिगृह खोली रिकामी करा अन्यथा ताबा घेणार, विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांना इशारा

पुणे, 21/10/2021: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पदवी पूर्ण झाली असली तरी विद्यार्थ्यांनी अद्याप वसतिगृह सोडले नाही. वारंवार सूचना देऊनही विद्यार्थी याकडे दुर्लक्ष करत असल्याने या विद्यार्थ्यांचे खोली ताब्यात घेण्याचा इशारा विद्यापीठ प्रशासनाने दिलेला आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून विद्यापीठातील वसतिगृहे पूर्णपणे बंद आहेत. विद्यापीठाने यापूर्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या खोली मधील साहित्य घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही विद्यार्थ्यांनी घेऊन सामान घेऊन गेलेले आहेत. मात्र अनेक विद्यार्थी अद्यापही विद्यापीठाकडे फिरकलेच नाहीत. या खोल्या बंद असल्याने आत मधील स्थिती कशी आहे? विद्यार्थ्यांचे साहित्य व्यवस्थित आहे का ? याबद्दल प्रशासन्ला कोणतीही कल्पना करता नाही. उंदीर, घूस यामुळे नुकसान झाल्याची शक्यता आहे. असे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत.

 

राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिलेली असल्याने थेट वर्ग सुरू होतील. विद्यापीठात नव्याने विद्यार्थी राहिले येतील त्यांच्यासाठी वसतिगृह उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक काढून सामान घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. जर विद्यार्थ्यांनी सामान काढून घेऊन खोलीची चावी परत न केल्यास प्रशासनातर्फे स्वतःहून खोली ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाणार असून खोलीतील साहित्य जमा केले जाणार आहे.