पुणे,दि.२०- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने अनिवार्य केलेला ‘रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स’ हा कोर्स नुकताच १०० विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यापीठातील ‘सेंटर फॉर पब्लिकेशन इथिक्स’ या विभागाने या हा कोर्स तयार केला आहे. विद्यापीठाकडून हा कोर्स सुरु करण्यासाठी सेंटरला अधिकृत मान्यता दिली आहे. या कोर्ससाठी २ श्रेयांक देण्यात आले असून या वर्षी १५ जून ते १४ जुलैदरम्यान हा कोर्स विद्यार्थ्यांनी पूर्ण केला.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी संशोधनातील नीतिमत्तेच्या महत्व विषद केले. तसेच विद्यार्थ्यांनी याविषयी अधिक जागरूक व संवेदनशील राहण्याची गरज व्यक्त केली. तर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनीही विद्यर्थ्यांनी अपार कष्ट करत उत्तम संशोधन करावे असा सल्ला दिला.
या कोर्समध्ये तत्वज्ञानाचे स्वरूप त्यातील विविध शाखा, त्यांचे संशोधनाशी संबंध, जगभरातील संशोधनाची मानके, वाङ्मयचौर्य, बनावट प्रकाशने व नियतकालिके व ते ओळखण्यासाठीची साधने, तंत्रे आदींचा समावेश आहे.
यावेळी सेंटरच्या प्रमुख डॉ. शुभदा नगरकर म्हणाल्या, या कोर्सदरम्यान भारतातील विविध विषयात पारंगत असलेल्या तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते. या कोर्ससाठी लागणारे संदर्भ साहित्य ऑनलाईन स्वरूपात ‘मुडल सॉफ्टवेअर’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोहोचविण्यात आले. डॉ. भाऊसाहेब पानगे, प्रा. एमेरिटस आदींनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
More Stories
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मान्यता
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्यास राज्य सरकारची मान्यता
पीएमपीएमएलतर्फे ‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे आयोजन