Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: ‘स्टार्टअप’ मार्गदर्शन मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, २१/०२/२०२२: नवोउद्योगांना त्यांच्या स्टार्टअपसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन तसेच कायदेशीर बाबींसाठी साहाय्य करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशनच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी व अन्य नागरिकांनाही या माध्यमातून आपल्या नवकल्पनांना आकार देता येणार आहे. आयटी, डीप टेक्नॉलॉजी, एज्यु टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, मटेरियल सायन्स, अग्रीकल्चर, मीडिया, इ कॉमर्स, फिनटेक, इलेक्ट्रॉनिक मोबेलिटी यांसह अन्य क्षेत्रांतील प्राथमिक अवस्थेतील स्टार्टअपला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी १५ मार्च २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

हे सर्वांसाठी खुले असणार असून ज्यांच्याकडे व्यवसाय देणाऱ्या कल्पना आहेत अशा नवकल्पकांना, सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप सुरू करणाऱ्या गटांना, कंपन्यांना तसेच प्राध्यापक विद्यार्थी अशा सर्वांना यासाठी अर्ज करता येणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती विद्यापीठाच्या http://iil.unipune.ac.in या संकेतस्थळावर मिळेल असे केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले.