पुणे: वकीलाचा तरूणावर अनैसर्गिक अत्याचार

पुणे, २८/०९/२०२२: फेसबुकवरुन ओळख झाल्याचा  फायदा घेत वकिलाने तरूणावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचे नग्न फोटो काढून त्याआधारे  तुझी बदनामी करेल असे सांगत सात लाख रुपये खंडणीची मागणी केली. परंतु तरुणाने पैसे देण्यास नकार दिला असता, वकीलाने तरुणाची आई व पत्नीकडून २० तोळे सोने घेऊन  फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवत ६ लाख ७० हजार रुपयांचा अपहार केला आहे. दशरथ बावकर (वय-२७,रा. ताथवडे ) याच्याविरूद्ध  भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात   गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी २६ वर्षीय  तरुणाने  तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार तरूणी आणि दशरथ यांची जानेवारी २०२२ मध्ये फेसबुकवरुन झाली होती. त्यानंतर ते एकमेकांना भेटल्यावर आरोपी दशरथने गोड बोलुन   भुरळ पाडली. त्याच्या सोबत विविध ठिकाणी  अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करुन त्याचे परस्पर नग्न फोटो काढले.   फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमका देत त्याच्या कुटुंबियाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याशिवाय आरोपी वकीलाने त्याच्याकडे सात लाख रुपयांची मागणी केली. त्यास पिडित तरुणाने नकार दिला असता आरोपीने तरुणाच्या आईस तुमचा मुलास मायग्रेशनचा आजार आहे असे खोटे सांगितले. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी त्याने तरुणाची आई व पत्नी यांच्याकडून २० तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणुक केली.