पुणे, २९ मे २०२५: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या शशांक हगवणे, त्याची आई लता हगवणे आणि बहीण करिश्मा हगवणे यांना शिवाजीनगर सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्यांची पोलिस कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
या प्रकरणातील पाचही आरोपींची पोलीस कोठडी काल संपली होती. त्यावेळी पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, तर सासरे राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज झालेल्या सुनावणीत शिवाजीनगर सत्र न्यायालयाने शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला.
कालच्या सुनावणीत हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत, तिचे काही ‘नको त्या’ व्यक्तीसोबत ‘नको ते’ चॅट सुरू होते, असे वक्तव्य केले होते. यानंतर वैष्णवीच्या कुटुंबीयांनी तात्काळ याचे खंडन करत वकिलांच्या आरोपांवर जोरदार आक्षेप नोंदवला होता. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी देखील वकिलांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.
दरम्यान, आजच्या सुनावणीत न्यायालयाने आरोपी शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांना तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले.

 
                                                                             
                                                                             
                                                                             
                                                                             
                                                                             
                 
                                         
                                         
                                         
                                        
More Stories
Pune: तबलावादन आणि गायनाने युवा तालचक्र महोत्सवाला सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ चे प्रकाशन
‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’च्या बोधचिन्हाचे आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण