पुणे: सराईत वाहन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात; दोन लाखांच्या दुचाकी जप्त

पुणे, २१/०८/२०२२: शहरातील विविध भागातून वाहने चोरणाऱ्या एका सराईताला लष्कर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून २ लाख ७ हजारांच्या चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पकडण्यात आले आहे. असिफ अकबर शेख (वय ३०) असे अटक केलेल्या वाहन चोरट्याचे नाव आहे. असिफ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शहरात वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी तसेच वाहन चोरटे व घरफोड्या करणाऱ्यांना आवर घालण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 

यादरम्यान, लष्कर पोलीस सराईत चोरट्यांची माहिती काढत होते. तर, एका वाहन चोरीचा तपास करताना सीसीटीव्हीची पडताळणी केली जात होती. परिसरातील तब्बल ३५ सीसीटीव्ही तपासले असता असिफबाबत माहिती मिळाली.

 

त्यानूसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, सहाय्यक निरीक्षक शितलकुमार गायकवाड, पोलीस अंमलदार रमेश चौधर यांच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले.