September 11, 2025

Pune: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून सूट

पुणे, दि. 22/08/2025: शासनाने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या गणेश भक्तांसाठी २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सवलत दिली आहे.

या सवलतीसाठी गणेशभक्तांनी उद्यापासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवसाबरोबरच सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशीही वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहनचालकाची अनुज्ञप्ती, कर प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र व वाहतूक परवाना इ. कागदपत्रे सादर केल्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालय, डॉ. आंबेडकर रोड, संगम ब्रिज जवळ, पुणे येथून कार्यालयीन वेळेत पथकरातून सूट मिळण्याबाबतचे पासेस उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे अंतर्गत येणारे आळंदी रोड कार्यालय व दिवे कार्यालय येथेही कार्यालयीन वेळेत पासेस उपलब्ध करुन दिले जाणार आहेत, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.