पुणे: सराईताकडून ५ पिस्तूलांसह १४ राऊंउ जप्त, विमानतळ पोलिसांची कारवाई

पुणे, दि. ०१/०८/२०२२: शस्त्रास्त्र विक्रीच्या तयारीत असलेल्या एका सराईताला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५ पिस्तलांसह १४ काडतुसे असा २ लाख २७ हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यापुर्वीही आरोपीला शस्त्रास्त्र विक्रीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

 

राहुल गोपाळ गवळी (वय ३५ , रा. बारीवाडा ता. चोपडा जि. जळगाव ) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

 

विमानतळ पोलिस ३१ जुलैला हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सराईत शस्त्रास्त्र विव्रेâत्याची माहिती पोलीस नाईक सचिन जाधव आणि प्रदीप मोटे यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप आणि पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे यांच्या पथकाने राहूलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ पिस्तूल, १४ काडतुसे जप्त केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त रोहिदास पवार, एसीपी किशोर जाधव, वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक रविंद्र ढावरे, अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, प्रदिप मोटे, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, संजय असवले यांनी केली.